ठाणे

जिल्ह्यात ड्राय डे पाळणे बंधनकारक

ठाणे  दि. 19 ऑक्टोबर २०19 : – राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ठाणे  जिल्ह्यात मद्यविक्री  करण्यास मनाई करण्यात आली असून हे दोनही दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे बंधनकारक आहे.

मा. मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क आयोगाच्या नियमांनुसार सर्व अनुज्ञप्तीधारकांना सूचित केले आहे की मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर  २०19 रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपुष्टात  येई पर्यंत म्हणजेच दिनांक 24 ऑक्टोबर २०19  चा पूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांना मद्य विक्रीकरिता ड्राय डे म्हणून पाळणे बंधनकारक असणार आहे.

ठाणे  जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ अनुज्ञप्तीधारकांना या दरम्यानच्या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ज्या अनुज्ञप्ती सदरील आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येतील अशा संबंधित अनुज्ञप्तीधारकाची ते धारण करत असलेली अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत नमूद तरतुदींन्वये  संबंधित अनुज्ञप्तीधारकावर फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!