डोंबिवली ( शंंकर जाधव )महायुतीच्या नेत्यांमधील विजयाचा आत्मविश्वास शुक्रवारच्या भर पावसात प्रचारात दिसून आला.डोंबिवली विधानसभा क्षेत्रात भाजप सेना रिपाइंचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांची प्रचारफेरी डोंबिवली पश्चिमेला सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली होती. मात्र पाउस थांबण्याची वाट न बघता भर पावसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे प्रचारात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या सोबत रिपाइचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड होते.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रचार सुरू आहे. प्रचाराची मुदत शनिवारी ६ वाजता संपणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी शुक्रवारची सायंकाळ कामी लावण्यासाठी महायुतीच्या उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा प्रचार भर पावसात करण्यात आला.कोपर येथून या प्रचार फेरीस सुरुवात झाली. या प्रचार फेरीत सेना भाजप, रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सेना भाजप चे नगरसेवक महिला आघाडी होते.
डोंबिवली पश्मिमेतील कोपरगांव येथून प्रचाराला प्रारंभ झाला. कोपररोड मार्गे कैलाषनगर, जुनीडोंबिवली, ठाकूरवाडी, विष्णूनगर, जैन कॉलनी, मोठागाव, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, राजूनगर, गणेशनगर, महात्मा फुले रोड मार्गे महात्मा गांधी रोड येथून अखेर सम्राट चौक येथील आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी प्रचार रॅलीचा समारोप झाला.