भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांनीही बजावला मतदानाचा हक्क…
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली विधानसभा मतदार संघ आणि कल्याण ग्रामीण मतदार संघात सकाळपासून नागरिक मतदानासाठी घ्राबाहेर पडले.नवमतदार आणि तरुण वर्गही मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल असे दिसत आहे.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात आणि डोंबिवली विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढल्याने यावेळी सरकारने केलेल्या मतदान जनजागृतीचा परिमाण झाल्याचे दिसते.भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब,पदाधिकारी मुकेश पांडे यांसह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला तर मतदान करा असा असे नागरिकांना आवाहन केले.तर डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रे नगर राजाजी पथ येथील भाजप नगरसेवक मुकुंद पेंढणेकर , डोंबिवली शहर अध्यक्ष संजीव बीडवाडकर यासह परिसरातील अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.