ठाणे

ठाणे जिल्हातील 18 विधानसभा क्षेत्रात अंदाजे 50 टक्के मतदान

ठाणे दि 21 ऑक्टोबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात किरकोळ अनुचित प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. 18 विधानसभा क्षेत्रात एकूण अंदाजे 50 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी दिली.

सर्व मतदार संघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे 50 टक्के मतदान झाले. या झालेल्या मतदाना बद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी मतदारांचे आभार मानले.

ठाणे जिल्ह्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेने किरकोळ अपवाद वगळता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता सुरळीत पार पाडली. मतदान केंद्रावर मतदारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा त्याचा लाभ घेतला.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुलभ (Accessible) निवडणूक म्हणून जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रात विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. त्याबद्दल बहुतांशी मतदारांनी जाहिर आभार देखील व्यक्त केले. तसेच पूर्वीची वरील मजल्यावरील मतदान केंद्र तळमजल्यावर आणल्यामुळे ज्येष्ठ नागरीक आणि इतर मतदारांनी आभार मानून समाधान व्यक्त केले. .

EVM व VVPAT बंद होण्याच्या काही तुरळक घटना झाल्या. तेथे तातडीने नविन मशीन देण्यात आल्या, त्यानंतर मतदान पूर्ववत सुरळीत सुरू झाले. मतदान प्रक्रियेत कोठेही अडथळा निर्माण झाला नाही.

डॉ.अनिल काकोडकर यांनी बजावला मताधिकार

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व निवडणूक आयोगाचे सदिच्छादुत डॉ.अनिल काकोडकर यांनी ठाणे येथील एल.आय.सी मंडल कार्यालय मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

मतमोजणी
जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरूवार, दिनांक 24 ऑक्टोबर, 2019 रोजी सकाळी ८ वा. सर्व अठरा विधानसभा मतदारसंघाच्या निश्चित करण्यात ठिकाणी होणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!