ठाणे

निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज

ठाणे दि. २२ आक्टोबर : ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २४ आक्टोबर रोजी १८ विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चित केलेल्या १८ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास १२०० कर्मचारी/अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात दि. २१ आक्टोबर रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मतदान घेण्यात आले. एकूण मतदान ४७.९१ %
जिल्ह्यात एकूण मतदान —
एकूण मतदार
एकूण मतदार
झालेले मतदान
टक्केवारी
एकूण मतदार
63 लाख ९२ हजार ३५७
३० लाख ६२ हजार ५४४
४७.९१%
पुरुष मतदार
34 लाख 79 हजार 508

१७ लाख ३२ हजार ९१२
४९.८०%
महिला मतदार
29 लाख 12 हजार 382
१३ लाख २९ हजार ४८७
४५.६५%
तृतीयपंथी मतदार
467
१४५
३१.०५%
दिव्यांग मतदार
10 हजार 489
३१४०
३०%

अशी होईल मतमोजणी
मतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे.

सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.

मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

मतमोजणी केंद्र
134-भिवंडी (ग्रामीण) –फरहान खान हॉल, मिल्लतनगर 2 ममता हॉस्पिटल जवळ, भिवंडी 421302,
135-शहापूर — प्रियदर्शनी हॉल, फॉरेस्ट ट्रेनिंग इन्स्टीटयुट, शहापूर जि.ठाणे,
‍136-भिवंडी (पश्चिम) — व-हाळदेवी माता मंगल भवन, तळमजला हॉल, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, कामतघर भिवंडी-421302,
137-भिवंडी (पूर्व) —लाटे संपदा नाईक मंगल कार्यालय जवळ, छत्रपती शिवाजी स्टैडियम, भादवडगाव ता.भिवंडी जि.ठाणे 421302,
138- कल्याण (पश्चिम) — मुंबई युनिव्हर्ससीटी सब सेंटर खडकपाडा, कल्याण (प.) हॉल 421301
139- मुरबाड — ऑक्सन हॉल एपीएमसी मार्केट मुरबाड ता.मुरबाड जि.ठाणे 421401,
140-अंबरनाथ — महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ-कल्याण बदलापूर रोड, अंबरनाथ (प.) 421501,
141-उल्हासनगर — उपविभागीय कार्यालय, पवई चौक उल्हासनगर-3 जि.ठाणे 421003,
142-कल्याण (पूर्व) — बॅडमिंटन हॉल, उल्हासनगर महानगरपालिका वार्ड नं.3 जवळ व्हीटीसी मैदान उल्हासनगर जि.ठाणे 421002,
143-डोंबिवली —सावित्रीबाई फुले कलामंदिर तळमजला, घरडा सर्कल जवळ, एमआयडीसी डोंबिवली (पुर्व) 421203,
144-कल्याण (ग्रामीण) — लाटे सुरेंद्र वाजपेयी इंदौर हॉल, सावळाराम महाराज मैदान, घरडा सर्कल डोंबिवली (पुर्व) 421203 जि.ठाणे,
145-मिरा-भाईंदर — रॉयल कॉलेज तळमजला, रॉयल हायर एज्युकेशन सोसायटी बिल्डींग, भक्ती वेदांन्त हॉस्पिटल जवळ, मिरारोड (पूर्व) 401107 जि.ठाणे,
146- ओवळा-माजिवडा — डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, पोखरण रोड नं.2, ठाणे (प.) बेथानी हॉस्पिटल बाजूला, ठाणे (प.) 400606, जि.ठाणे,
147-कोपरी-पाचपाखाडी — आयटीआय, वागळे इस्टेट वर्कशॉप नं.1,रोड नं.28, रामनगर, वागळे इस्टेट ठाणे (प.) 400604, जि.ठाणे,
148-ठाणे — न्यू होरीजन स्कूल, हिरानंदानी इस्टेट, बाजूला, रोदास इनक्लेव, कोलशेत, घोडबंदर रोड, ठाणे 400615 जि.ठाणे,
149-मुंब्रा-कळवा — श्री.मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रिडा संकूल कौसा-मुंब्रा (बॅटमिंटन हॉल), 400612 जि.ठाणे,
150-ऐरोली — सरस्वती विद्यालय सेक्टर-5, प्लॉट नं-13 ऐरोली, नवी मुंबई 400606 जि.ठाणे,
151-बेलापूर — आग्री-कोळी सांस्कृतिक भवन, वाजीराणी नॅशनल ॲकॅडमी स्पोर्टस सेक्टर-24, नेरुळ नवीमुंबई 400706 जि.ठाणे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!