ठाणे

रांगोळी स्पर्धेत पाण्याखालील रांगोळी ठरली आकर्षक…

क्षितीज शाळेतील शिक्षक आशिष पाटील यांची वारली रांगोळी…

डोंबिवली  ( शंकर जाधव ) रांगोळी  ही कला चौसष्ट कलापैकी  एक कला आहे. या कलेला आजही समाजासमोर आपले स्थान ठेऊन आहे.डोंबिवलीत इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुभ मंगल कार्यालयात मोफत भव्य रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन भरविण्यात आले आहे.या स्पर्धेत पाण्याखालील रांगोळी आकर्षक ठरली. पाण्याखालील रांगोळी पाह्ताना रांगोळीप्रेमींना रांगोळीसोबत सेल्फिचा मोह आवरता आला नाही. तर क्षितीज गतिमंद शाळेतील शिक्षक आशिष पाटील यांनी आदिवासी समाजाच्या जीवनावर आधारित वारली रांगोळीचे कौतुक होत आहे

     रांगोळीचे नाते प्राचीन भारतीय संस्कृतीशी आहे. रांगोळीचे अस्तित्व प्रागैतिहासिक काळापासून असल्याचे दाखवता येते आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास येते. ज्याप्रमाणे रांगोळी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते, त्याचप्रमाणे ती प्राचीन भारतीय तत्त्व, चिंतन आणि लोकधारणा यांचाही वारसा सांगते. रांगोळीद्वारे मूर्त रूपे निर्माण केली जातात आणि अमूर्त अशा संकल्पनांचा बोधही रांगोळीतून होतो. या कलेचा उगम धर्माच्या अनुबंधातच झाला आहे. डोंबिवलीत भरविलेल्या स्पर्धेत ३५ जणांनी भाग घेतला. खडे मिठाची रांगोळी, वारली रांगोळी, ठिपक्यांची रांगोळ, फ्री-हँड रांगोळी (गालीचा), पोट्रेट, मिठाची रांगोळी, फुलांची, पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, दिव्यांची रांगोळी अशा अनेक स्वरूपांत रांगोळी काढली.  या अश्या अनेक प्रकारच्या रांगोळ्या पाहण्यासाठी डोंबिवलीकर आवर्जून आले होते.अंजली खिस्ती यांनी पाण्याखालील रांगोळी काढली असून ही रांगोळी स्पर्धेतील आकर्षक ठरली आहे.तर क्षितीज गतिमंद शाळेतील शिक्षक आशिष पाटील यांनी काढलेली वारली रांगोळी काढली. `देवूनी हात मदतीचा, लावू दिवा प्रकाशाचा`,`ज्ञानाची दिवाळी हीच खरी दिवाळी` असे संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या अध्यक्षा लता म्हसूरकर म्हणाल्या, दिवाळीला सर्वजन घरोघरी रांगोळ्या काढत असतात. आमच्या मनात कल्पना आली कि, त्यांची कला एकच ठिकाणी दिसू देत. म्हणून आम्ही आम्ही रांगोळी स्पर्धा आयोजित करून आपली कला सादर करण्यास सांगितले. रोहिणी लोहकरे म्हणाल्या, या कलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन होते. रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला आहे. या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रभाकर पिंगळकर आणि अंजली पिंगळकर यांनी काम पहिले.

 अशी काढावी पाण्याखालील रांगोळी…

    प्रथम एका ताटात तेल लावावे. त्यानंतर ताटात आपल्या हवी अशी रांगोळी काढावी.मग त्यात रंग भरावे. रंग भरून झाल्यानंतर हळूहळू कडेने पाणी टाकावे.आता तयार झाली पाण्याखालील रांगोळी. अशी रांगोळी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून या रांगोळीचे आकर्षण सर्वानाच असते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!