उल्हासनगरात दिपावलीच्या पुर्व संध्येलाच घातापाताला सुरुवात.
उल्हासनगर (गौतम वाघ)- उल्हासनगर कँम्प क्रं पाच येथील इंदिरा नगर परिसरात एका जिन्स कटिंग व्यवसायीकाची किरकोळ वादातुन छातीत कैची भोसकुन हत्या करण्यात आली आहे.
दिलीप कुमार खुशवा वय ३८ असे मयत इसमाचे नाव असुन मंगळवारी राञी ११ वाजेच्या सुमारास आरोपी सोनु चौगुले व त्याचे तीन साथीदार हे दिलीप ह्यांचा कारखान्या शेजारी दारु पिण्यासाठी आले असता दिलीप ह्यांने त्यांना रोखले व त्यांना येथे दारु पिऊ नका असे बजावले माञ राग अनावरण आलेल्या सोनु,यश,राहुल,आशिष ह्यांनी शिवीगाळ करत दिलीपशी हुज्जत घालत त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची करत भांडण सुरु केले आरोपी सोनु चौघुले ह्यांने कारखान्यातील कैची घेऊन दिलीपच्या छातीत भोसकली, रक्तबंबाळ असलेल्या दिलीपला पाहुन आरोपीने तेथुन पळ काढला, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत मयत दिलीप ह्याला स्वच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली असुन आरोपी सोनु चौघुले २१,यश पाटील १९,राहुल पंजवानी २०,आशिष राजानी २१, असे आरोपीचे नावे आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर गुन्हाचा तपास पोलीस निरिक्षक मोहन खंदारे हे करित आहे.