ठाणे

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदाराची हॅट्रीक 

गणपत गायकवाड १२ हजार ३०७ मतांनी विजयी
कल्याण   ( शंकर जाधव  )  गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी काहीच विकास कामे केली नाहीत हाच प्रमुख मुद्दा घेऊन आमदार गणपत गायकवाड यांचा पराभव करण्याचे बंडखोरीच्या माध्यमातून शिवधनुष्य उचलून गायकवाड यांना या विधानसभा निवडणूकीत चारीमुंड्या चित करण्यासाठी एकवटलेल्या कल्याण पूर्वेतील सर्व शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना धुळ चारत आमदार गणपत गायकवाड यांनी साडेबारा हजारांच्या फरकांनी दणदणीत विजयी संपादन केला आहे.
      या मतदार संघात ही निवडणूक केवळ मात्र भाजप आणि शिवसेनेतच झाल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गणपत गायकवाड यांनी मतांची आघाडी घेत अंतीम विजयी संपादन केला आहे. या मतदार संघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते. यापैकी खरी लढत शिवसैनिकांचे उमेदवार धनंजय बोडारे आणि गणपत गायकवाड झाल्याचे मतमोजणी दरम्यान स्पष्ट झाले. गणपत गायकवाड यांना 60 हजार 5 मते पडली. तर धनंजय बोडारे यांना 47 हजार 608 मते मिळाली. यामध्ये गणपत गायकवाड यांनी 12 हजार 307 मतांची आघाडी घेऊन विजयी संपादन केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!