डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण ग्रामीण भाग हा शिवसेनेकडेचा राहणार असे चित्र दिसत होते. युती झाल्याने शिवसेनेच्या मदतीला भाजप आली होती. पण २७ गाव गावातील नाराजी आणि दिवा शहराचा आशीर्वाद यामुळे मनसेचे उमेदवार प्रमोद ( राजू ) पाटील यांचा विजय झाला.यात मनसेच्या दोन नगरसेवकांनी केलेल्या कामांची हि पोच पावतीच म्हणावी लागेल. तर शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक कमी पडल्याचे दिसत आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे प्रमोद (राजु )पाटील यांना विजय मिळाला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना मनसेचे प्रमोद (राजु )पाटील यांचा विजय झाला. राजु पाटील यांना ९३ हजार ९२७ मते पडली तर युतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मते पडली. यावेळी ६ हजार ९२ मतदारांनी कोणताही उमेदवार नको म्हणून कौल दिला होता. तर ६ हजार १९९ मतदारांनी वंचित बहुजन समाज पक्षाच्या अमोल केंद्रे यांना पसंती दिली होती. २७ गावात २१ नगरसेवक असून घारीवली – काटई उसरघर प्रभागातील नगरसेविका पूजा पाटील आणि घेसर-निळजे प्रभागातील नगरसेवक प्रभाकर जाधव हे दोन नगरसेवक मनसेचे आहेत.तर इतर प्रभागात शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आहेत.२७ गावातील ग्रामस्थांना गावे पालिकेत समाविष्ट झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.स्वतंत्र नगरपालिका अशी मागणी असताना त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले स्वतंत्र नगरपालिकेचे आश्वसन दिले होते.मात्र आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने गावकरी नाराज झाले होते. यावर मनसेचे उमेदवार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी जाहीरनाम्यात २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणार असल्याचे नमूद किले होते. तर दिवा शहरात १३ नगरसेवक आहेत ,पैकी शिवसेनेचे ८ नगरसेवक तर ३ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आहेत. कल्याण ग्रामीणच्या निवडणुकीत दिव्यात सुमारे ३० हजार मतदान झाले असून त्यापैकी सुमारे १७ हजार मतदान हे मनसेच्या पारड्यात पडले.यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडणून आले होते.
मनसेने जाहीरनाम्यात `नाशिक पॅटन`चा अवलंब केला आहे. कल्याण ग्रामीण भागात नाशिक शहरात ज्या प्रमाणे बोटॅनिकल गार्डन बनवले आहे, त्याच धर्तीवर दावडी येथे एक सुंदर वनउद्यान उभारणार आहेत.त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात येणार आहेत. मनसेचे कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसे उमेदवार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.आता प्रमोद ( राजू ) पाटील हे निवडणूक आल्याने बोटॅनिकल गार्डन बनवल्यास नागरिक खुश होईल.