डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याणमध्ये वृत्तसंकलन करण्यास गेलेली पत्रकारांवर फेरीवाल्यांनी दादागिरी गेली होती.तर डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील अनुकूल हॉटेल समोरील वृत्तपत्र विक्रेत्यांला फेरीवाल्यांनी दमदाटी केल्याची घटना घडली होती.हे वृत्त प्रसारित होताच प्राशसन जागे झाले. डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर येथील एका अनधिकृत स्टोलवर फटाक्यांची विक्री होत होती.पालिकेच्या ‘फ’प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे आणि फेरीवाला हटाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.या कारवाईत फटाक्यांचे स्टोल आणि मंडप काढत फटाक्यांची विक्री बंद केली.याबाबत दीपक शिंदे यांनी रस्त्यावर फटाके विक्री करण्यास परवानगी नसून तसे कोणी केल्यास त्यांच्यावर पालिका प्रशासन कडक कारवाई करेल.
रस्त्यावर फटाक्याची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे आणि फेरीवाला हटाव पथकाने केली कारवाई…
October 26, 2019
163 Views
1 Min Read

-
Share This!