महाराष्ट्र

 पक्षाकडून न्याय मिळण्याची आशा

जळगाव : पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष वाढीसाठी लढत आहे. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाची चौकशी झाली. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. माझे तिकीट का कापले? याचे उत्तर मला मिळाले नाही. मुलीच्या विरोधात बंडखोरीच्या बाबत वारंवार बोलून काहीच कारवाई झाली नाही. तरीही मी पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे मला पक्षाकडून न्याय मिळण्याची आशा आहे. अशी अपेक्षा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी जळगावात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. यावेळी राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या २५ गोष्टी वर पुस्तक लिहण्याचा विचार करत असल्याचे खडसे म्हणाले.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पत्रकारांना जळगावातील मुक्ताई निवासस्थानी दिवाळीच्या फराळाला बोलावले होते.यावेळी त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचे घटलेले संख्याबळ, दोन्ही पक्षातील बंडखोरी याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!