मुरबाड : मुरबाड मधील “गर्जा कलामंच” ही संस्था सातत्याने तालुक्यामध्ये कलाक्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून कार्य करत आहे. कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून नावारूपास आलेला “गर्जा कट्टा” हा दर महिन्याच्या चौथ्या रविवारी आयोजित केला जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून या महिन्यातील कट्ट्यावर दिवाळी निमित्त विशेष दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एस. एस. जी .पी. प्रोडक्शन निर्मित आणि गर्जा कलामंच प्रस्तुत दोन नवीन अल्बम गीते “तुझे माझे अबोल नाते” आणि “कसं विसरू मी तुला” या नवीन गीताचे प्रदर्शन करण्यात आले. तर एस. एस. जी. पी. प्रोडकशन निर्मित व गर्जा कलामंच मुरबाड प्रस्तुत “जी.पी” या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात “स्त्री शक्ती” हा पुरस्कार देऊन पत्रकार आशा रणखांबे याना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी एस. एस. जी. पी. चे संचालक श्री प्रफुल्ल दादा मोरे, सुप्रसिद्ध अभिनेते अभय राणे, सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे साहेब, पंचायत समितीचे सभापती दत्तू वाघ , शिवसेना मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे, मुरबाड नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, नगर सेविका छाया चौधरी, कस्तुरी पिसाट, नगरसेवक रवींद्र देसले, कोमसापचे मुरबाड अध्यक्ष लक्ष्मण घागस, शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वारघडे यादी मान्यवर उपस्थित होते. नानाविध धमाकेदार कलाकृतींनी हा सातवा कट्टा उजळून निघाला. जी. पी. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक नितेश मंगल डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमर राऊत यांनी केले.
गर्जा कलामंचच्या सातव्या गर्जा कट्ट्या वर “दिपोत्सव” साजरा
October 29, 2019
36 Views
2 Min Read

-
Share This!