गुन्हे वृत्त

नागपुरात स्वयंघोषित ‘डॉन’ला पोलिसांनी धडा शिकवला, रस्त्याने ‘वरात’ काढली

नागपूर : नागपूर पोलिसांनी कुख्यात गुंड आणि नागपूरच्या व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असलेल्या स्वयंघोषित ‘डॉन’ला चांगलाच धडा शिकवला आहे. नागपूरच्या व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा गुंड संतोष आंबेकरच्या मुसक्या आवळत त्यांची ‘वरात’च काढली. नुकतंच संतोष आंबेकरला गुजरातच्या व्यापाऱ्याला धमकावून पहिले पाच कोटी आणि नंतर एक कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर संतोष आंबेकरला न्यायालयात नेताना पोलीस नामी शक्कल लढवत त्याला मोकळ्या पायेने आणि हाफ पॅन्ट घालून रस्त्यांवरून पायी घेऊन गेले.

पोलिसांच्या त्या युक्तीला आता यश येऊ लागले असून नागपुरात दहशत निर्माण करणाऱ्या संतोष आंबेकर विरोधात आता एकेक करून अनेक तक्रार समोर येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या विरोधात एका महिला डॉक्टरने धमकावून बलात्कार केल्याची, काही व्यापाऱ्यांनी धमकावून खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता त्याच्या आधारावर पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात मकोका लावत त्याची संपत्ती जप्त करणे सुरु केले आहे.

आज पोलिसांनी त्याच्या पाच महागड्या कार, दोन महागड्या बाईक्स यासह एकूण साडे पाच कोटींची संपत्ती जप्त केली आहे. नागरिकांनी निर्धास्तपणे कोणत्याही भीती शिवाय समोर येऊन संतोष आंबेकर याच्या विरोधातल्या त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे द्याव्या, आम्ही कठोर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!