उल्हासनगर (गौतम वाघ)- कुठला ही नागरिक असो वा उच्च पदस्थ अधिकारी असो, त्यांच्या परिपूर्ण नावाचा परिपाठ, तत्सम मंडळींना माहीत असणे, हे नित्य नियमाचेच. पण पोलीस खात्यातील उच्च पदस्थ अधिकार्याचे नाव त्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत असू नए म्हणजे, एक प्रकारची शोकांतिकाच? असाच काहीसा प्रकार उल्हासनगर पोलीस खात्यात घडत आहे.
काल झालेल्या एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिमंडळ – ४ उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी.टेळे यांच्या उपस्थितीत एक अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला. पण सदरची बाब अत्यंत खेदावह वाटत होती की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव फक्त आडनावाने घेण्यात येत होते.ही बाब उपस्थित पत्रकारांना सातत्याने जाणवत होती. टेळे ह्यांच्या प्रथम नावातील गौनपणा शोधतांना अक्षरशः परिमंडळ – ४ मधील मोजक्याच पोलीस निरीक्षकांना नाव माहिती आहे. परंतु कर्मचारी यांना ह्या प्रथम नावा विषयी माहिती विचारली असता, त्यांच्या कडे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मग स्थानिक पत्रकारांना देखील कोणास नावा बद्दल माहिती आहे का? विचारणा केली असता तेही अधांतरीच उत्तरले.
ह्या प्रकारा मुळे पत्रकारांमध्ये संभ्रमतेची स्थिती निर्माण झाली असून, नेमके बातम्यांमध्ये एक वरिष्ठ अधिकार्याचे नाव उद्धट पणे टाकणे, हे निती नियमास निश्चितपणे धरून नसल्याने चांगलीच फजिती झाली. पण आपल्या वरिष्ठांच्या नावा चा गंध पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना असू नए, ही खरचं मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.