डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याणमध्ये राहणा:या मधुरा जोशी या १३ वर्षीय विद्यार्थीने पुणो येथे पार पडलेल्या रोप मल्लखांब स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. रोप मल्लखांब स्पर्धा नुकतीच पुणो बारामती पार पडली. जिल्हा क्रीडा परिषद जिल्हास्तर रोप मल्लखांब असे या स्पर्धेचे स्वरुप होते. 14 वर्षे खाली वयोगटातील मधूरा ही पुणो येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मधूरा हिने तिस:या क्रमांक पटकाविल्याने तिची विभागीय स्तरावर होणा:या रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मधूराला समीरन कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी आणि क्रिडा विभाग प्रमुख संदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले होते. मधूराने रोप मल्लखांबात प्राविण्य मिळविले आहे. ती मूळची कल्याणची असल्याने तिच्या कामगिरीबद्दल तिच्यावर कल्याणमधील मल्लखांब प्रेमीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोप मल्लखांब स्पर्धेत कल्याणची मधुरा जोशी तिसरी
October 31, 2019
23 Views
1 Min Read

-
Share This!