ठाणे

विठ्ठलवाडी पोलीसांन कडुन निराधार मुलांना मदतीचा हात.

उल्हासनगर(गौतम वाघ)  अनाथ व निराधार मुलांन साठी अनेक सामाजिक संस्था व समाजातील विविध घटक आपआपल्या परिने मदतीचा हात देत असता पण आपल्या कामाच्या ओघातुन नाम निराळ्या पद्धतीने मदतीचा हात देणारे पोलीस खाते हे तारीफ करावे तेवढी कमी.

असाच काही प्रकार आज सांयकाळी परिमंडळ-४ मधिल सहाय्यक पोलीस उपायुक्त डी. टेळे व विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश भामे सह कर्मचाऱ्यांनि कुर्ला कँम्प येथील शासकीय सर्टिफाइड शाळेतील अनाथ व निराधार मुलांना दिवाळीच औचित्य साधुन मिठाई व फटाक्याचे वाटप केले तो क्षण बघण्या सारखा होता. जेव्हा ह्या मुलांनी पोलिसां सह फटाक्याची आतीष बाजी केली आणि त्याच्या चेहऱ्यावर उमलेले हसु व डोळ्यांतील चमक बर्याच काही गोष्टी सांगत होत्या.अनाथ लहान मुलांन कडे पाहुन पोलीस बांधव ही भारावुन गेले सलाम अश्या पोलीस कार्याला जिथे माणुसकी अजुनही जागुन आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!