मुंबई : शिवसेनेच्या गटनेतेपदी आज शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यांची एकमतानं निवड करण्यात आली. शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहेत
गुरूवारी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेच्या विधीमंडळातील गटनेत्याची, तसंच पक्षप्रतोदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली. तर सुनिल प्रभू यांची पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली. शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याच्या शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यांचा गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याप्रमाणे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.