डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत ‘जननी आशिष ‘ही संस्था गेली तीन दशके अनाथ बालकांचे संगोपन करत आहे या आश्रमातील ३ वर्षाच्या बालिकेला श्वासोछावास त्रास होत आहे यासाठी मोठी शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करण्यात आली आहे यासाठी बराच खर्च असूनसंस्थेला हा खर्च परवडणारा नाही तरी दानशूर नागरिकांनी उदारपणे आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.जननी आशिष संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेतील रेश्मा नावाची ३ वर्षांची बालिका श्वासोच्छवास समस्येने त्रासलेली आहे. श्वास तिच्याफुफ्फुसामध्ये जाण्याऐवजी छातीच्या गुहांमध्ये जातो तिच्या श्वसन नलिकेत फट असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. डॉ. सुनीता कामत यांनी ऑपरेशन करून जोडणी बंद केली. यामुळे हवा योग्य प्रकारे फुफ्फुसामध्ये जात आहे. यासाठी तिला रक्त देण्यात आले असून आणखी रक्ताची गरज आहे. या सर्व प्रक्रियेसाठी खूप खर्च झाला आहे. तो संस्थेला परवडणारा नाही. यासाठी समाजातील दानशूर नागरिकांनी उदार हस्ते मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे संपर्क –जननी आशिष
Email::[email protected] , फोन -0251-2455879.