ठाणे

प्रतापगडावरील ढासळणार्‍या बुरुजांची तत्काळ दुरूस्ती करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाने प्रसिद्ध पावलेल्या प्रतापगडाचे बुरुज मोठ्या प्रमाणात ढासळू लागल्याने महाराष्ट्राच्या, देशाच्या भुगोलातून गड-किल्ले नष्ट होण्याची शंका इतिहासतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या गंभीर घटनेची दखल घेत किल्ल्यांच्या संवर्धन व जतन करण्यासाठी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश शंकर आवळे यांनी घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. उदयनराजे भोसले, पर्यटनमंत्री व महसूलमंत्री यांना बुरुजांच्या छायाचित्रासह लेखी निवेदन दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची निव मजबूत रहावी याकरिता बुरूज बांधण्यात आलेलेआहेत. परंतु आजची परिस्थिती बघितली असता त्याच बुरुजांना सावरण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराजांच्या प्रतापगडावर जाण्याच्या वाटेवर शिवशंकर मंदिर आहे व त्याच वाटेवर मंदिराअगोदर प्रतापगडावर बुरूज आहे. या बुरुजाच्या मध्यभागी वटवृक्षाची वाढ झाली आहे. त्यामुळे बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड व दुरवस्था होत आहे. अनेक बाजूंनी भेगा गेल्या आहेत. अशा परिस्थिती बुरुजाला तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. प्रतापगडाला हजारो पर्यटक, ऐतिहासिक वास्तू अभ्यासक येत असतात. अशा प्रसंगी सदर बुरूज किंवा वाढीस आलेले वृक्ष कोसळल्यास मोठी जिवीत व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. प्रतापगड किल्ला  खा. छत्रपती उदयनराजे भोसेले यांच्या मालकीचा असल्याने वास्तविकतः त्यांनी या किल्ल्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सदर किल्ल्याकडे पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने इतिहासाचा वारसा जपणारे व महाराष्ट्राचे मनोधैर्य वाढवणारे किल्ले असे शासनाच्या दुर्लक्षामुळे ढासळत आहेत, अशी खंत मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश शंकर आवळे यांनी व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांना छायाचित्रासह लेखी पत्र ईमेलवर पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!