ठाणे

मिञच बनला मिञाचा वैरी!

मिञाचा वैरी बनलेल्या मिञाने मिञाच्यां मदतीने काढला मिञाचा काटा !!

डोक्यात गोळी घालुन वैमन्यासाचा काढला वचपा!

गेल्या पंधरवडय़ातील उल्हासनगरातील ही दुसरी घटना!!

उल्हासनगर : (गौतम वाघ)- फोन वरुन झालेल्या क्षुल्लक बाचाबाची चे पर्यावसान जीवघेण्या हल्ल्यात होऊन, एका तरूणाचा भरवस्तीत फायरिंग करून खून करण्यात आला. घडलेल्या प्रकाराने अवघे शहर हादरले असून, ज्या पाण्याच्या टाकी च्या आवारात ही घटना घडली, सुरक्षा भिंतींच्या अभावाने, आधीच अनेक गैरकृत्यांनी गाजलेले हे ठिकाण, ह्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.
मयत भरत चंद्रकांत लष्कर (वय २२ वर्ष) ह्याला त्याच्याच मिञांने हत्येचा कट रचत त्याची निर्घुन पणे हत्या करण्यात आली.
कृष्णा कुंभार असे वैरी मिञाचे नाव असुन कृष्णाची पत्नी आणि भरत ची मैत्रिण हे एकाच ब्युटी पार्लर मध्ये एकत्र काम करीत होत्या. काही दिवसांपूर्वी भरत आणि कृष्णाच्या पत्नी मध्ये फोन वरून क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली कृष्णाच्या पत्नीने हिललाईन पोलीस ठाण्यात मयत भरत विरुद्ध तक्रार दिली.त्यानंतर ही बाब कृष्णाला त्याच्या पत्नीने सांगताच त्याचा राग अनावर झाला.मनात डूग धरून कृष्णा याने सलीम आणि कलर ऊर्फ अभिजीत,उदय यांना घडलेला प्रकार सांगून, सूड उगवण्यासाठी त्यांची मदत मागितली आणि ते तयार ही झाले.
काल रात्री कुर्ला कॕम्प येथील पाण्याच्या टाकीच्या आवारातील प्रज्ञा करुणा मुखबधीर शाळेच्या पायर्‍यांवर भरत लष्कर आणि त्याचा मित्र फिर्यादी आनंद हे दोघेजण दारू पीत बसले होते तर दुसरीकडे कुर्ला कॕम्प येथील तीन गार्डन परिसरात कृष्णाचे मित्र हे ही दारु पीत बसले होते. भरत हा जवळच पाण्याच्या टाकीजवळ बसलेला असल्याची माहीती कृष्णाला मिळाली.त्याने ताबडतोब सलीम आणि कलर,उदय ह्यांना ही बाब सांगून पाण्याच्या टाकीजवळ बोलावले. त्यानुसार ही सगळी मंडळी घटनास्थळी पोहोचले आणि सलीम ह्याने भरत च्या डोक्यावर कट्टा धरून फायरींग करत गोळ्या झाडल्या तर कलर व त्याचा साथीदार उदय ह्यांने चाकूने गळ्यावर सपासप वार केले. भरतला मारल्यानंतर ह्या दोघांनी त्याचा मित्र आनंदला संपवण्याच्या हिशोबाने मोर्चा वळवला, पण त्याने तिथून पळ काढला आणि जवळच्याच एका ठिकाणी लपून बसला, त्यामुळे तो वाचला. कृष्णाने दुचाकीवर सलीम,कलर आणि उदयला घेऊन तेथुन पळ काढला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भरतला पोलिसांनी इस्पितळात दाखल केल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असता कृष्णा कुंभार व उदय भाटकर ह्यांना ताब्यात घेतले माञ डोक्यावर गोळी झाडणारा सलिम व गळ्यावर शस्ञाने सपासप वार करणाऱ्या अभिजीत उर्फ कलर ला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहे.त्याच्यावर भा.द.वी कलम ३०२,३४ आर्म अँक्ट ३,२५ सह मपोका ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या सगळ्या प्रकारात, पाण्याच्या टाकीचा परिसर हा सुरक्षा भिंत व रक्षका अभावे लव स्पॉट, गंजड्यांचा व गुन्हेगारांचा अड्डा झाला असून, इथे घडणाऱ्या गैरकृत्यांमुळे स्थानिक नागरिक ही त्रस्त आणि दहशतीच्या सावलीत वावरत आहेत. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या ह्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखों नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे. शिवाय सातत्याने होणाऱ्या चोऱ्यामुळे आणि गांजा, चरस सारख्या मादक पदार्थांना आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या पोलीसांच्या भुमिकेवर ही संशय व्यक्त केला जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!