
मोखाडा तालूक्यांत मागेल त्याला शेततळे या संकल्पनेतून बहूतांश गांवांमधून शेतक-यांना फळबाग लागवडी साठी उद्यूक्त करण्यांत येत आहे.तथापी ही योजणा केवळ ५०,००० रूपयांत राबवायची असल्याने शेतक-यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यामूळे मागेल त्याला शेततळे ही योजणा शेतक-यांसाठी सद्यातरी ” असून अडचण , नसून खोळंबा ” ठरलेली आहे.
मोखाडा तालूक्यातील शेतक-यांनी जलयुक्त शिवार योजणा , सामूहिक शेततळे आदिंच्या माध्यातून फळबाग लागवडीकडे वाटचाल सुरू केलेली आहे.व तालूक्यातील आणखीही शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी प्रवृत्त होत आहेत.परंतू योजणेतील त्रुटींमुळे शेतक-यांचा हिरमोड होत असल्याची लोकभावना आहे.
मोखाडा तालूक्यात आजपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी सह शेकडो शेततळे साकारण्यांत आलेली आहेत.परंतू या शेततळ्यांचा मुरमाड जमीनींमूळे प्लैस्टीक अभावी काहीच उपयोग झालेला नाही.हीच परिस्थिती मागील २८ शेततळ्यांच्या बाबतीत झालेली आहे.शेततळ्यांचे निर्माण तर झाले परंतू त्यामध्ये प्लैस्टीकचे आच्छादन नसल्याने पाण्याचा साठा होत नाही . पर्यायाने शेतक-यांना कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेता येत नाही व हंगामी शेतीची लागवड करणेही दुरापास्त होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजणेतही शेततळ्यांचा समावेश आहे आहे.अशा प्रकारची सर्वच शेततळे रोजगार हमी योजनेतून केली तर शेतमजूरांसह शेतक-यांच्या हातालाही काम मिळेल अशी मागणीही या धर्तीवर जोर धरीत आहे.त्यादृष्टीने शासनाने साधकबाधक विचार करावा अशी मागणी तालूक्यातील मजूरांकडून केली जात आहे.