ठाणे

आरटीओ कार्यालयाच्या नावाने बनावट पेज…

विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 डोंबिवली ( शंकर जाधव ) गुगल वेबसाईटवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याणच्या नावाने बनावट पेज बनवून त्यावर ९३३०६६९७८५ असा खोटा मोबाईल क्रमांक प्रदर्शित करून एका अर्जदाराची २२,७९८ इतकी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच कार्यालयाने खडकपाडा पोलीस ठाण्यात पुढील तपासणीसाठी २२ ऑक्टोबर रोजी सादर केले होते.डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात अश्या प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.कल्याण आरटीओ च्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि, या कार्यालयामार्फत कुठल्याही मोबाईल क्रमांक प्रदर्शित करण्यात आला नाही. ऑनलाईन कामाकाजाकरिता या विभागाची www.parivahan.gov.in ही अधिकृत वेब असून फक्त याद्वारे सर्व प्रकारचे अर्ज शासकीय फी व कर स्वीकारले जातात. या व्यक्तिरिक्त कुठल्याही अन्य वेबसाईटद्वारे कार्यालयीन कामकाजाकरता अर्ज वा रक्कम भरणा करण्यात येऊ नये. तसेच या कार्यालयीन कामकाजा करता आपणास बँकेमार्फत प्राप्त ओटीपी वा इतर माहिती अनोळखी व्यक्तीस कळवू नये असे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!