रॕकेट चालवणारी कांग्रेस महिला कार्यकर्ताला अटक
लगातार दिवसाआड मर्डर, हाणारामारी,चोऱ्या आणि सेक्स रॅकेट मुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह?
उल्हासनगर(गौतम वाघ) : शहरातील एलाईट म्हणजेच पॉश एरिया आणि अनेक शासकीय विभागातील मंत्रालय पासूनचे सूपर क्लास वन अधिकारी जिथे वास्तव्यास आहेत, अशा परिसरातील पाण्याच्या टाकीच्या भागात, आधी फायरींग होऊन एक मर्डर व सलग तिसर्याच दिवशी सेक्स रॅकेट उघड होउन कॉंग्रेस ची कार्यकर्ता व एस.ई.ओ. च थेट कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने, कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुर्ला कँम्प येथील पाण्याच्या टाक्यांचा परिसर हा एकदम झाडाझुडपांनी नटलेला व अत्यंत शांततापूर्ण ख्याती प्राप्त असतांना. सुरक्षा भिंती व रक्षकांच्या अभावे लव्हर्स पॉईंट व गुन्हेगारीचा अड्डा झाला आहे. त्यामुळेच दोनच दिवसांपूर्वी तरुणांच्या एका घोळक्याने फायरींग करून एका तरुणाचा मर्डर केला. ह्या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्यापही फरार असतांना, टाकी समोरच्याच साजन पॅलेस शेजारील बैठ्या घरात, कॉंग्रेस च्या जुन्या कार्यकर्त्या व विशेष कार्यकारी अधिकारी (S. E. O) उषा चंद्रशेखर आठले ( वय वर्ष ६२) ह्यांच्या निवासस्थानी ठाणे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी घातलेल्या धाडीत, बनवारीलाल सुखदेवराम चौधरी (वय वर्ष ५५) आणि दोन पीडीत महिलांना भा. द. वी ३७०(२)३७०(३) १९५६ चे कलम ३.४ व ५ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. पोलिसांतर्फे पाठविण्यात आलेल्या बनावट गिर्हाईकाच्या माध्यमातून हा सगळा प्रकार उघड झाला आहे.उषा आठले ह्या फोन च्या माध्यमातुन गिर्हाईक हेरत असे आणि आर्थिक अडचणीत व घरगुती समस्यां मध्ये फसलेल्या महिलांना, पैशांचे आमीष दाखवून त्यांच्या कडून देह व्यापार करवून घेत असे. गिर्हाईकांकडून २०००/- रु प्रत्येकी घेऊन, पीडीत महिलांना केवळ ५०० ते १००० रु देत असे. अशा प्रकारे कित्येक विवाहीत महिलांचे व मुलींचे आयुष्य उध्वस्त केले.हे काम उषा आठले नेमके किती दिवसांपासून करीत होत्या व अशाच मॉडस अॉपरेंडी ने, ह्या पॉश एरिया मधून अजून किती रहिवासी ठिकाणी असे देह विक्री चा धंदा राजरोस पणे सुरू असल्याचा ज्वलंत प्रश्न सर्वत्र सध्या चर्चिला जात आहे.
लागोपाठ च्या दोन घटनांनी संपूर्ण परिसर हा भेदरलेल्या अवस्थेत असून, ह्या मुळे परिमंडळ – ४ च्या पोलीस प्रशासनाचे लक्तरे, ठाणे समाजसेवा शाखेने टांगल्याचे, सर्वत्र चर्चा जोरात सुरू आहे.