ठाणे

जागेच्या वादावरून वसार गावात भावकीनेच केला आप्तेष्टांवर जीवघेणा हल्ला!

३ जण गजाआड, ८ जण फरार!

फिर्यादीवर ही ३२४ दाखल

अजब तुझे सरकार!!!!!
—————————————-
उल्हासनगर (गौतम वाघ) :  सिटी सर्व्हे च्या मोजणीत निघालेल्या अधिकृत जागेची मागणी आपल्याच भावकीला विनवणीपूर्णरित्या करण्याचा हरजाना, परिवारावर आयतेच संकट ओढवून, जीवावर बेतला आणि ८-१० जणांच्या हल्ल्यातून बचावल्या नंतर ही उलटे पोलिसांनीच ३२४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडल्याने, ” कानून की देवी अभी भी पट्टी मे बंधी है ” असा सूर पोलीसां विरोधात सर्वत्र उमटत असल्याचे चित्र सध्या उमटत आहे.
हा सगळा प्रकार अंबरनाथ येथील वसार गावात घडला असून, एकनाथ शनिवार वायले (वय ३६) यांच्या गावातच असलेले रघुनाथ शिवराम राणे व इतरां सोबत अनेक दिवसांपासून जागेचा वाद सुरू होता. त्यातून अनेकदा भांडण व मारामाऱ्या होवून हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. सोमवारी रात्री एकनाथ वायले आणि त्यांची पत्नी त्यांच्या घराच्या हॉल मध्ये जेवन करून बसले असता व त्यांची मुलगी ही बाहेर अंगणात झाडांना पाणी देत असतांना, गावातील अमृत वायले हा त्यांच्या घराकडे रागाने बघत निघून गेला. काही वेळा नंतर अमृत ने त्याची आई कविता व आत्या शांताबाई राणे यांना फिर्यादी एकनाथ वायले यांना घराबाहेर बोलावून, तु अमृत कडे बघून का हटकले? असे विचारपूस करून शिविगाळ करू लागले. त्यांच्या पाठोपाठच मागून दर्शन वायले, प्रभाकर वायले, राहुल वायले, रघुनाथ राणे, अविनाश वायले, राजाराम वायले, जेजेराम वायले ही मंडळी हातात चॉपर, लोखंडी रॉड, मोटरसायकल ची चेन, काठय़ा व दगडे घेऊन चाल करून आली आणि ताबडतोब काही न बोलताच फिर्यादी वर जोरदार जीवघेणा हल्ला सुरू केला. इतक्या ताकदीने दगडफेक व काड्यांचा हमला केल्याने फिर्यादीस बचाव करण्यासाठी व पळ काढण्यासाठी वेळ ही मिळाला नाही. ह्या हल्ल्यात एकनाथ यांच्या पत्नीने पतीस होत असलेल्या मारहाणीस अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना ही मारहाण करण्यात आली आणि रक्तबंबाळ होऊन त्याही गंभीररित्या जखमी झाल्या. ह्या मारहाणीत एकनाथ यांच्या वर हल्ला चढवतांना त्यांच्या हाता – पायावर व अंगावर काट्यांनी व लोखंडी रॉडने तुफानी प्रहार करण्यात आले. त्यातच अविनाश याने त्याच्या हातात असलेल्या चॉपर ने एकनाथ यांच्या डोक्याचा मध्यभागी जोरदार वार करून जीवे मारण्याचाच परिपूर्ण प्रयत्न केला. चक्कर येऊन पडल्यानंतर ही एकनाथ यांच्या वर जोरदार हमला सुरूच ठेवण्यात आला, जणू जीवानिशी संपवण्याच्याच इराद्याने. पण फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी हिने जीवावर उदार होवून, वडीलांच्या समोर उभी राहून, हातात काठी घेउन हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला व त्यात ती सफल ही झाली आणि एकएक करून हमलाकरी त्यांच्या अंगणातून सटकले.
हा सगळा हमल्याचा थरार, एकनाथ यांनी त्यांच्या वर अनेकदा अशाच प्रकारे झालेल्या हमल्याच्या अनुषंगाने, लावलेल्या सी.सी. टीव्ही कॅमेर्‍यां मध्ये कैद झाला आहे. ह्या वादाचे मुळ, म्हणजे सिटी सर्व्हे विभागातर्फे घालण्यात आलेल्या मोजणीत, एकनाथ वायले यांची जमीन रघुनाथ शिवराम वायले यांच्या जागेत निघाल्याने, रितसर मागणी करून देखील जमीन न दिल्याने, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सातत्याने तक्रार करून, एकदा तोडू कारवाई व आता तर थेट घर खाली करण्याच्याच नोटिसेने कातावून गेलेल्या व मनात राग व सुडाच्या भावनेनेच हमला करण्याचा प्रकार घडला आहे.
सदरच्या जीवघेणा हल्ल्या संदर्भात हिललाईन पोलीस ठाण्यात एकूण दहा जणां विरोधात ३७८/२०१९ भादविका कलम३०७,१४३,१४४,१४७,१४८,१४९,५०४,४२७, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, राहुल वायले, अविनाश वायले, राजाराम वायले यांना दि. ५ रोजी रात्री १९. ४० वा अटक करण्यात आली आहे मात्र बाकीचे आरोपी अजून ही मोकार फिरत आहेत.

*ह्या सर्व प्रकरणात फिर्यादी एकनाथ वायले यांच्या पत्नीचा जबाब महत्त्वपूर्ण असून, घरात फक्त तिघेच जणं असतांना व माझ्या पतीस, आमच्याच घरी येऊन घूसून मारहाण करणार्‍यां पासून वाचविण्यासाठी कोणीच नसतांना व सगळा प्रकार सी. सी. टीव्ही कॅमेर्‍यांत स्पष्टपणे दिसत असतांना पोलिसांनी नेमके आमच्या वर ३२४ अंतर्गत कसा काय गुन्हा दाखल केला आहे? आमच्याच घरी येऊन लोकांनी जीवे मारण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला व पतीच्या डोक्यात १५ टाके पडून, हातपाय देखील गंभीररीत्या जखमी झाले असतांना व आमचे सर्व नातेवाईक इतर गावां मध्ये वास्तव्यास असतांना, त्यांच्या सह आमच्या वर कसा काय गुन्हा दाखल केला? हा एक प्रकारचा अन्याय असून, ह्या विरोधात गृहखाते व मा न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सदर बाब अतिशय गंभीर असून, पोलिसांच्या भुमिकेवर संशय घेण्यास वाव असल्याचे सरळसरळ दिसून येत असून, अशा प्रकारे स्वतः वरचे घोंगडे झटकून मेलेल्यालाच बळीचा बकरा बनवण्याचे धोरण, ह्या वेळी पोलिसांच्याच अंगावर येण्याचे संकेत दिसत असल्याचे, कायदेविषयक जाणकारांनी खाजगीत मत व्यक्त केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!