ठाणे

ठाण्यात आदिवासी जनजागृती आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन

ठाणे दि.7 :  क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व आदयक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती निमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आयोजित ठाण्यात आदिवासी जनजागृती मेळावा आणि आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे भव्य आयोजन येत्या रविवारी दि.10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यत खेवरा संर्कल, खेवरा फार्म हाऊन, चितळसर-मानपाडा, घोडबंदर रोड,ठाणे (प) येथे करण्यात आले आहे. सदर दिवशी क्रांतीज्योत मिरवणूक,दिपप्रज्वलन- उद्घाटन, स्वागत गीत,मान्यवरांचे भाषणे, गौरीनाच, तारपानाच , बोहडा सोंग, व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवासाठी स्नेह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महोत्सव आयोजना मागील मुख्य हेतू म्हणजे आदिवासी बांधव नोकरी व रोजगारासाठी ठाणे शहर, मुंबई –उपनगर, नवी मुंबई या शहरी भागात व त्या आजूबाजू परिसरातील वाडया- पाडयातील आदिवासी समाज बांधव विखुरलेल्या व समाजापासून दुरावलेल्या अवस्थेत राहत आहे. आदिवासी समाजाच्या रितीरिवाजाच्या सांस्कृतिक व पंरपरेचा विपरीत शहारातील सांस्कृतिला बळी पडत आहे.काळाची गरज ओळखून आपल्या भावी पिढीला आपल्या सांस्कृतिचे व रितीरिवाजाचे, कलेचे, पंरपरेचे व आदिवासी सांस्कृतिचे दर्शन व्हावे व आदिवासी अस्मिता जोपासली जावी म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रयत्न सुरु आहेत. तरी जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी वेळातवेळ काढून आपल्या आदिवासी महोत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थापक तथा अध्यक्ष हंसराज खेवरा, सदस्य्‍ा सुनिल तुकाराम भांगरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!