(जीवन संघर्षकार नवनाथजी रणखांबे, लेखक , कवी, वक्ता,निवेदक , समीक्षक )
*या वर्षी अरबी समुद्रात ६४ केंटी पेक्षा (११.४) किमी प्रति तास जास्त वेग असलेल्या वायू, हिका, क्यार आणि महा ही चार महा चक्री वादळे निर्माण झाली आणि जलचक्र बिघडले आणि शेतीचे अर्थचक्र ही बिघडले….. ही चार चक्री वादळे ११७ वर्षांनी पुन्हा अरबी समुद्रात आली १९०२ ला एकाच वर्षात पाच चक्रीवादळ अरबी समुद्रात आली होती. अधून मधूनही चक्रीवादळाचा सामना करावा लागला आहे. आज नोव्हेंबरमध्ये ही पाऊस पडत आहे. आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत. आता बांगलच्या उपसागरातील ‘ बुल बुल’ या चक्रीवादळाची शक्यता तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे….*
पाऊसाने झोडपले आणि राजाने मारले तर मग जायचे कुठे…..? हे प्रश्न जुनेच…….
सकाळी सकाळी माझी ऑफिसला जाण्याची घाई आणि पाऊस सुरुच …
दिवसा चांदनं पडावं आणि रात्री सूर्य उगवाव अशिच परिस्थिती आज पाहतो अशी झाली आहे. ती म्हणजे परतीचा
*अवकाळी पाऊसाचा जोर*
*सर्वांच्या जीवाला घोर*
अशी परिस्थिती निर्माण करून चक्रीवादळे आणि पाऊसच राजकारण खेळत आहे. याला करावं काय ? आणि म्हणावं काय ? हैराण झालो रे बाबा…… चक्रीवादळे आणि पाऊस , मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन !! मी पुन्हा येईन !!! असेच म्हणत खेळी करीत आहे की काय…….?
एक हवालदिल शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या समस्या आ वासून पुढे आहेत……..या समस्या आणि त्यांच्यावर आभाळ फाटनारे संकटे पाहून मन आणि ऊर भरून येते , कंटात कापरे भरून थंडी ताप अंगात नाचू लागतो…….तशी माझी अस्वस्थता वाढू लागली….. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा असून एक लेखक आहे.
पावसाळा संपला सण वार निघून गेले तरी हा पाऊस पडतच आहे. काय म्हणावं , काय करावं आणि काय बोलावं मोठी पंचाईत झाली आहे ना राव! या पाऊसने तर यंदा वाटच लावली आहे.
*हाता तोंडाला आलेला घास पाऊसाने हिरावून नेहताना शेतकरी* *राजा काहीच करू शकत नाही. आज पाहतो तर मोठ्या प्रमाणात काढणीला आलेल्या पिकांनच्या कणसाच्या दाण्यामधून काही* *ठिकाणी मोड आले आहेत. काही ठिकाणी पीक धान्य काळी झाली असून खाण्या लायक नाही तर द्राक्ष बागेत काही द्राक्ष सडत आहेत*. *ज्वारी, बाजरी,भात, उडित, द्राक्षे , मूग, सोयाबीन, कापूस,कांदे,मका इ. पिकांचे मोठ्या प्रमाणत राज्यात नुकसान झाले आहे*.
*मका, ज्वारी आणि कापून /खुडून ठेवलेले इतर पिके पाऊसात भिजून सडली आहेत. पिकांचे नुकसान होवून काही ठिकाणी जमिनीवर पडलेले पीक पाण्यात पडून कुजले आहे तर पिकांचे दाणे तेथेच उगवले आहेत. टोमॅटो मरगळला आहे, कांदे पाण्याखाली भिजून भिजून जमिनीत रडत आहेत. आज हा रडणार कांदा, उद्या कांद्याची कमतरता पडून महागाईने भविष्यात सर्व सामान्यांना नक्कीच कांदा रडवेल….*
परतीचा पावसामुळे भाज्या आणि कडधान्य महाग झाले आहेत.
काही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे तर काही शेतमजूर बेरोजगार झाले आहेत.
कायम सुख्या दुष्काळ भागतील शेतकरी कंटाळून गेले आहे सुख्या दुष्काळाला वैतागलेला माझा शेतकरी मित्र मला भेटल्यानंतर बोलला,
“पाऊसाला त्याची उर फाटूस्तवर पडूदे यंदा पण पुढच्या वर्षी टायमांत पडावा आणि टायमांत बंद व्हावा………नाही तर प्रत्येक वर्षी त्याचा छळ आणि झळ हा पाचवीला पुजलेला आहे. काय नशीब झाक लिवलय सटवाईने”.
तर जास्त पाऊसाच्या ठिकाणी काढणी करताना परतीचा पाऊस आल्याने पाऊसाच्या पाण्यात भात शेती नष्ट होतांना शेतकऱ्यांच्या डोळयांतला पाऊस यंदा विसरणे अशक्य आहे.
लेखक -: नवनाथजी रणखांबे
तासगाव
मोबाईल -: ९९६७४३५०३२
(लेखक हे इंडिया/इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विजेते आहेत)