ठाणे

“आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” च्या वतीने काढला जुलूस” 

अंबरनाथ/विशेष प्रतिनिधी :   प्रत्येक समाजात लोक हे आपापले सण साजरे करताना दिसतात, परंतु याठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक दिसत नसून सर्व समाजाचे लोक हे याठिकाणी आहेत हि एक आनंदाची गोष्ट आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार अब्दुल सत्तार वणू हे कोणत्याही गोरगरिबांवर अन्याय झाल्यास त्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात. तसेच वणू हे गोरगरिबांसाठी ज्या पद्धतीने  मदत करता येईल त्या पद्धतीने ते करत असतात. “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” या संस्थेला कुठलीही मदत लागल्यास सदामामांना आठवण करा, मामा सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे मार्गदर्शन राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी करत उपस्थित सर्व नागरिकांना “ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे-धेंडे यांनी हि मोलाचे मार्गदर्शन करत “ईद-ए-मिलाद”च्या शुभेच्छा दिल्या.
           मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही “ईद-ए-मिलादुननबी” या सणाचे औचित्य साधून “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” च्या वतीने जुलूस/मिरवणूक काढण्यात आली होती. तत्पूर्वी “ईद-ए-मिलादुननबी” निमित्त अंबरनाथ पश्चिमेकडील वणू निवास, हनुमान नगर, फॉरेस्ट नाका याठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका प्रज्ञा बनसोडे-धेंडे, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, उद्योजक अरुण पाटील, भटके विमुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे, प्रेस क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष कमर काझी, पत्रकार उस्मान शाह, टीम-द-युवाचे अध्यक्ष योगेश चळवादी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नजीर ठाणगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी “मिलाद” चे पठण करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार वणू यांनी आलेल्या मान्यवरांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अल्लाहबक्श शेख, समीर सिद्दीकी, ह्दयनारायण पांडे, मेहबूब अमीन शेख, मुन्ना खान, बादशाह शेख, असलम शेख, इम्तियाज मुस्तफा शेख, अरविंद जैस्वार, प्रदीप गुप्ता, मोहन पवार, पंढरी जाधव, बळीराम पाटील, रघुनाथ मावरे, शिवाजी जाधव, किशोर महाजन, शांताराम दोरिक, व्ही तंगराज, नूरजहाँ शेख, वैशाली दोरिक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर वणू निवास हनुमान नगर येथून जुलूस/मिरवणूक काढण्यात आली, सदर मिरवणूक हि कल्याण-बदलापूर महामार्गे होत लादीनाका, बुवापाडा, भेंडीपाडा, विमकोनाका, उलनचाळ होऊन कोहोजगांव येथील हजरत गैबन शाह बाबा दर्गाह येथे ‘मजार’ वर फुलाची चादर पेश करत समाप्त झाली.
            हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष अब्दुलसत्तार वणू यांच्यासह उपाध्यक्ष इमामसाब शेख, सचिव जाफर वणू, सहसचिव बादशाह शेख, कार्याध्यक्ष नवाज वणू, खजिनदार अब्दुल रेहमान खान, सदस्य अब्दुल रहीम शेख, प्रदीप तांबोळी, संतोष गुप्ता, असलम शेख आदींनी प्रयत्न केले. विशेष करून खजिनदार अब्दुल रेहमान खान यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष नवाज वणू यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!