डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर २०२० साली होणारी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका पॅनल पद्धतीने होणार आहेत. साधारणतः ऑक्टोबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या पालिकेत एकूण १२२ नगरसेवक आहेत. पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत चार प्रभागाचा एका वॉड होणार असून एका मतदाराला चार वेळा मतदान करता येणार आहे अशी माहिती माजी आमदार सुभाष भोईर यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात दिली. डोंबिवलीजवळील एमआयडीसी निवासी विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार सुभाष भोईर आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रस्ता क्रमांक ५ येथे सदर काम होणार असून यासाठी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, स्थानिक नगरसेविका पुजा योगेश म्हात्रे, नगरसेवक विनोद काळण, कल्याण ग्रामीण युवासेना अधिकारी योगेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण विधानसभा महिला संघटक कविता गावंड, उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील, विभाग प्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख रवि म्हात्रे , भालचंद्र कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पॅनल पद्धतीने निवडणुका होणार नाही नाही असा प्रश्न विविध राजकीय पक्षातील नगरसेवकांना पडला होता. या चर्चेच्या पाश्वभूमीवर माजी आमदार सुभाष भोईर यांनी डोंबिवलीत माहिती दिली.आगामी केडीएमसीची निवडणूक पॅनल पद्धतीने होण्याची शक्यता आहे. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे ५२, भाजपचे ४२, मनसेचे १०,कॉंग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे २ नगरसेवक आहेत. स्वीकृत असल्याने एकूण १२२ नगरसेवक आहेत. मागील निवडणूक ही प्रभाग निहाय झाली होती, पण आता शासन निर्णयानुसार ती पॅनल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आता पालिकेच्या निवडणुकीलाकाही महिने शिल्लक राहिले असल्याने पालिकेची प्रभाग रचना निवडणूक आयोगाद्वारे जाहीर होण्याची शक्यता आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी भागातील विकास कामांच्या प्रसंगी आमदार भोईर बोलत होते.यावेळी माजी आमदार भोईर यांनी केडीएमसीची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, जनतेने निवडून दिल्यानंतर आमदार म्हणून आम्ही विकास कामांसाठी कटिबद्ध असतो.एमआयडीसी विभागातून मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते हे कधीही विसणार नाही.२७ गावांबाबत बोलायचे झाल्यास एमआयडीने या गावाबाबत हवे तेवढे सहकार्य केले नाही.महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील एमआयडीसी कडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी निर्देश देऊन भूमिगत गटार वाहिन्यांसाठी २७ कोटी रुपये मंजुर झाले. त्याचबरोबर एमआयडीसी विभागात पथदिव्यांकरिता ५ कोटी रुपये मंजूर मिळाली. ओएस ४ येथील जागा जलकुंभाकरिता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली असून भविष्यात २७ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.तर उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी गटाराचे, रस्त्यांचे काम सुरु असताना नागरिकांनी या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे असे सांगितले.