नवी मुंबई : नवी मुंबई परीसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाण्याकडून जेरबंद करण्यात आले असून एकूण 7,27,400 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने तर गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच कळंबोली पोलिस ठाण्याकडून लोखंडी सळईचा माल व ट्रेलर असा एकूण 20 लाख रुपये किंमतीचा माल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सहायक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
चोर व दरोडेखोरांना पोलिसांकडून अटक
November 12, 2019
42 Views
1 Min Read

-
Share This!