भाजप नगरसेवकाच्या पाठपुराव्याला यश..
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासन मेहरबान असल्याने अनेक वेळेला महासभेत सर्व नगरसेवकांनी आवाज उठविला होता. त्यानंतरही शहरात अनधिकृत बंधाकाम सुरूच आहे. पाकिकेने आरक्षित ठेवलेल्या भूखंडवहि काहींचा डोळा असून त्यावरही महिनाभरात अनधिकृत बांधकाम करून इमारती उभी केली. डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाच्या बाजूकडील बागेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरु आहे. या बांधकामाची भाजप नगरसेवक शैलेश धात्रक आणि अनेक नागरिकांच्या तक्रारीवर बुधवारी पालिकेच्या `ह` प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी पोलीस बंदोबस्तात हि कारवाई केली. याबाबत नगरसेवक धात्रक यांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाच्या बाजूकडील बागेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरु आहे.या अनधिकृत बांधकामाच्या बाबत भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत. `ह` प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे, `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यासह कर्मचार्यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. सदर अनधि इमारतीचे काम राजरोजपणे सुरु असताना डोंबिवलीकरांनी पालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तळअधिक पाच मजल्याच्या या अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाई होत असताना नागरीका खुश झाले होते. `ह` प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांनीहि पालिकेचे कौतुक केले आहे. या कारवाईबाबत नगरसेवक धात्रक यांना विचारले असता ते म्हणाले, अनेक दिवसांपासून या अनधिकृत बांधकामाची तक्रार पालिकेकडे केली होती. माझी प्रभागात एकही अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून मी नेहमी जागरूक असतो. माझा प्रभाग हा डोंबिवलीतील सर्वात स्वच्छ, सुंदर तर आहेच आणि या प्रभागात एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही याचीही काळजी घेत असतो. तर `ह` प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी पालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे.`ह`प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.