ठाणे : अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ आज सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन हा अपघात झाला . गीता माळी यांच्यासोबत त्यांचे पती विजय माळीसुद्धा या अपघातात जखमी झाले असून शहापूर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. आज सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गायिका गीता माळी यांचा शहापूरजवळ कार अपघात दुर्दैवी मृत्यू
