पुढील हप्तात सत्ता स्थापनेचा दावा होण्याची शक्यता,
मुंबई : {गौतम वाघ- विशेष प्रतिनिधी} महाराष्ट्राचे राजकारण सध्या अत्यंत वेगळ्या वळणार आहे. महाराष्ट्रतील जनतेने कधी विचारही केला नसेल अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात उदयास येत आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-Nationalist Congress Party – Congress Party) अशी ही आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचे समसमान वाटप यांवरून संपुष्टात आली. युती संपुष्टात आल्याचे दोन्ही पक्षांनी अधिकृतपणे जाहीर केले नाही हे विषेश. त्यामुळे या नव्या आघाडीचे सत्तावाटप (Power Sharing Formula For Government Formation) कसे असेल याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांनी या सत्तावाटपाची माहिती दिली आहे. त्यानुसार या दोन्ही पक्षांमध्ये ठरलेले सत्तावाटपाचे सूत्र पुढीलप्रमाणे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ केंद्रिय मंत्री अमहमद पटेल यांच्यात काल रात्री उशीरा झालेल्या चर्चेचा हवाला देत सूत्रांनी सांगितले की, या तीनही पक्षांमध्ये सत्तेचे समसमान वाटप होणार आहे. एकूण 42 मंत्रीपदांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे मुख्यमंत्री पद अडिच-अडिच वर्षे वाटून घेण्यात येईल. काँग्रेस पक्षाकडे सलग पाच वर्षे उपमुख्यमंत्रीपद असेन.तर उर्वरीत मंत्रीपदे ही तिन्ही पक्षांनी म्हणजेच शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडे 14-14 मंत्रिपदे मिळतील असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला असू शकतो. मंत्रिपदांसोबतच महामंडळं आणि इतर काही संस्थांवर निवडल्या जाणाऱ्या अध्यक्षपदांचेही समसमान वाटप केले जाईल. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकालानुसार संख्याबळाचा विचार करता भाजप (BJP) – 105,शिवसेना (Shiv Sena) – 56,राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02,समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत.