ठाणे

महाराष्ट्रात चारही पक्षाचे सर्व आमदार सत्तेच्या नाट्यात व्यस्त ! मात्र मनसेचा एकमेव आमदार मतदारांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त..

कल्याण    : राज्यात महिनाभरापासून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे आमदार सत्ता स्थापन करण्याच्या नाट्यामध्ये व्यस्त आहेत. मात्र मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे जनतेच्या समस्या सोडवण्यात व्यस्त आहेत.
                           राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांचे आमदार काही दिवस बाहेर, काही दिवस पंचतारांकित हॉटेलवर तर काही दिवस मुबंईत,दिल्लीत दिसत आहेत. मात्र दुसरीकडे मनसेचे एकमेव निवडून आलेले आमदार प्रमोद (राजू)पाटील हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मुबंई, ठाणे,पालघर तसेच आपल्या मतदार संघात फिरताना दिसत आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर
दुसऱ्या दिवशी पासूनच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले कार्य सुरू केले आहे आणि कामाचा धडाका सुरू केला.
                                    आमदार पाटील यांनी निवडणून आल्यावर या काही दिवसात मुंब्रा,दिवा,14 गाव येथे येऊ घातलेली टोरंट कंपनी विरोधात आंदोलन.कल्याण मधील पत्रिपुल, डोंबिवली मधील कोपरपूलचा पाठपुराव्यासाठी आणि पुलकोंडी लवकर सोडवण्यासाठी मध्य रेल्वेच्या उप-व्यवस्थापकांची मुबंईत भेट घेतली. केंद्र सरकारच्या फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात स्थानिकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करण्यासाठी मध्यरेल्वे आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यात तोडगा निघत केडीएमसी मधील बीएसयुपीची घर प्रकल्पग्रस्तांना देण्याचा निर्णय झाला. कल्याण ग्रामीण भागात आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले.त्याची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.राज्यातील विविध विषय घेऊन राज्यपालांची भेट घेतली. दिवा डम्पिंगचा विषय असेल किंव्हा दिवा शहरातील इतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू करत आमदार “आपल्या दारी” या संकल्पनेला सुरवात केली. केडीएमसी आयुक्तांची भेट घेत फेरीवाला विषय, कल्याण ग्रामीण मधील पाणी विषय याबाबत चर्चा केेली.तसेच उसरघर मधील स्थानिक नगरसेवकांच्या कामांचे भूमीपूजन असो किंव्हा इतर कार्यक्रमला जातीने हजर राहिले. त्यामुळे सध्या राज्यात चालेल्या घाणेरड्या राजकाराणापासून स्वतःला लांब ठेवत संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांसमोर एक नवा आदर्श निर्माण करत मतदारांचा आदर केला.तर दुसरीकडे मतदारांना गृहीत धरण्याचे काम राज्यातील चारही पक्षांकडून सुरू आहे.

PHOTO GALLERY

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!