डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली मानपाडा परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घरकाम जाणाऱ्या नेपाळी दाम्पत्याने डल्ला मारत रोकड सोन्या चांदीचे दागिने असा मिळून एकूण १९ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उजेडात आली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात वझीर व पुजारा या नेपाळी दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल करन्यात आला आहे.
डोंबिवली पूर्व एमआयडीसी मिलाप नगर येथील संगम या बंगळ्यामध्ये राहणारे माधव सिंग आपल्या कुटुंबा सोबत राहतात .त्यांच्या घरात वझीर व पुजारा हे नेपाळी दाम्पत्य गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होते .काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सिंग कुटुंबीय ठाणे येथे खरेदी करण्यास गेले होते . ही संधी साधत त्याच्या घरात घरकाम करणारा वझीर व पुजारा यांनी संधी साधली .दोघांनी बेडरूमच्या दरवाजाचे लैच तोडून बेडरूम मध्ये प्रवेश करत १० लाखांचा रोकड सह सुमारे साडे नऊ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने असा मिळून एकूण १९ लाख ४५ हजरांचा मुद्देमाल लंपास केला .सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी चोरी करत पसार झालेल्या नेपाळी दाम्पत्य वझीर व पुजारा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .दरम्यान पोलिसांकडून नोकरांचे ओळखपत्र व कागदपत्रांची खातरजमा करत ही कागदपत्रे पोलीस स्थानकात देण्याचे आवाहन याआधी अनेकदा करण्यात आले मात्र नागरिक ही माहिती देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे अशा घटनाना सामोरे लावे लागते.