[आपले शहर टीम ठाणे , दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ ]
ठाणे : दिवसेंदिवस होणारी व्रुक्षतोड आणी वाढत चाललेले शहरीकरण व कॉंक्रीटीकरन यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत चालली असताना आज ठाणे शहरात भल्या पहाटे पाच महिने वयाचा कोकीळ पक्षी कावळ्यांचा हल्यात जखमी झाल्याचे निदर्शनास आले. ठाणे शहराच्या नौपाडा भागात कावळ्यांच्या हल्यात जखमी कोकीळ रस्त्यावर पडल्याने जाग्रूत नागरिकांनी तत्काळ पक्षी प्रेमी अक्षय गीझे यांना बोलावले असता त्यांनी कोकीळेला अलगद पकडून जीवदान मिळऊन दिले. जखमी कोकीळेवर उपचार करून खानपान मिळाल्याने कोकीळेला जीवदान मिळाले. कोकीळ हा पक्षी आपल्या गोड वाणीतून कुहूकुहू ऐकवत असतो पण दिवसेंदिवस शहरात हा आवाज लोप पावत चालला आहे.