कोकण

पर्यटन विकास संधीबाबत नागपूरात कोकण पर्यटन परिषद

कोकण :   कोकणात पर्यटकांची वाढ होऊन येथील पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देषाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने TAAMT या संस्थेच्या मदतीने नागपूर येथे 07 व 08 डिसेंबर 2019 रोजी कोकण पर्यटन परिषद आयोजित केली आहे. या आयोजित होणाऱ्या परिषदेमध्ये नागपूर येथील पर्यटन व्यावसायिकांना कोकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. तसेच कोकणातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहन सेवा, टूर ऑपरेटर, निवास न्याहरी, महाभ्रमण, जलक्रिडा, स्कुबा डाविंग व साहसी क्रिडा यांची माहिती दिली जाईल. या कार्यशाळेमुळे कोकणातील व्यावसायाला व इतर खाजगी उद्योजकांना लाभ व कोकणात जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करणे शक्य होईल .

राज्यातील कोकण विभाग हा पर्यटनासाठी विविध निसर्गसौंदर्य व वैविध्यतेने समृध्द आहे. विविध समुद्रकिनारे, जलदुर्ग, इतिहासकालीन गड, किल्ले, मंदिर वास्तू आहेत. त्याचबरोबर कातळशिल्पे व निसर्गसौंदर्याने कोकण समृध्द आहे. कोकणातील मेवा व विविध खाद्यपदार्थ उद. उकडीचे मोदक, सोलकढी, कोंबडी वडे इ. खाद्यपदार्थ देखील पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करतात.
कोकणातील उद्योजकांना या कार्यशाळेत सहभाग घ्यावयाचा असल्यास उदय कदम मो.क्र.9987445511 यांच्याशी संपर्क साधा असे वरिष्ट प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी कळविले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!