महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

http://aapale shahar news 25 november 2019

मुंबई, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला.

श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. या अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!