गुन्हे वृत्त

एलएसडी पेपर व एमडी पावडर विकणाऱ्या चार आरोपींना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक

ठाणे:   सध्या तरुण पिढी मध्ये ड्रुग्सचे व्यसन वाढत चालले आहे, व्यसन करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या मार्केट मध्ये येत आहेत, आयटी क्षेत्रा मध्ये काम करणाऱ्या तरुण मंडळींमध्ये, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये हे प्रमाण वाढत चालले आहे, कामाचा वाढत प्रेशर, जागरण, कामाचे वाढलेले तास याचा याचा सगळा ताण घालवण्या साठी तरुणाई या ड्रग्ज कडे कळत नकळत वळते, यांना ड्रग्ज पुरवणारे सुद्धा तरुणच असतात ते अशा ताणतणाव ग्रस्त तरुणांना बरोबर हेरतात व आपली शिकार बनवतात, पब मध्ये, हॉटेल मध्ये, पार्ट्यांमध्ये अशा प्रकारचे ड्रग्ज पुरवण्याचा प्रकार होत असतो, या वाढत्या ड्रग्जच्या प्रकाराला आळा घालण्याचे काम ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुरु ठेवले होते, त्यांचाच तपास चालू असताना येऊर उपवन परिसरात गस्त घालत असताना,त्यांना दोन तरुण मारुती स्विफ्ट कारने संशयास्पद फिरत असताना, त्यांना दिसले त्यांना ताब्यात घेतले व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे 25, 000/- रुपये किमतीची 5 एलएसडी पेपर व 2 ग्रॅम एमडी पावडर हा अमली पदार्थ मिळून आला. या दोन्ही इसमांना अटक करण्यात आली त्यांची नावे सलमान नवाबअली शेख वय 28 राहणार मुलुंड व संजीव उर्फपॉल रामअग्या चौहान वय 27 राहणार नवी मुबंई असून त्यांच्या विरुध्द वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार व त्यांच्या पथकाने या दोघांची सखोल चौकशी केली असता नवी मुबंई येथे राहणारे त्यांच्या साथीदारांनी त्यांना हे अमली पदार्थ पुरवल्याचे सांगितले त्या प्रमाणे नवी मुबंई येथून नितीन मारुती लामतुरे वय 33 राहणार नवी मुबंई, सुशांत संभाजी रसाळ वय 32 राहणार नवी मुबंई यांना अटक करण्यात आली, त्यांच्या कडे चौकशी केली असता सुशांत संभाजी रसाळ हा ठाणे, नवी मुबंई, मुबंई या परिसरात मोठ्या प्रमाणात एलएसडी पेपर व मेफेड्रोन या पार्टी ड्रग्जची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले, त्याच्या घराची झडती घेतली असता त्याने विक्री करिता आणलेले 104 एलएसडी पेपर, 56 ग्रॅम मेफेड्रोन, 6.4 ग्रॅम चरस असा अमली पदार्थ व अमली पदार्थाच्या तस्करीतून मिळवलेले 98, 000/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले, या गुन्ह्यात आता पर्यंत 11, 61, 640/-रुपयाचा अमली पदार्थ 98, 000/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे, या सगळ्यांना 25/11/2019 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे, या दोन जणांना प्रेम अय्यर नावाचा इसम अमली पदार्थ सप्लाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे, पोलीस त्याचा तपास करत आहेत, ह्या अगोदर जून मध्ये सुद्धा अशीच कारवाई कॅडबरी येथे ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती त्यावेळी क्लिंटन स्वामी, हितेश मल्होत्रा या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या कडून 25 एलएसडी पेपर व एक किलो चरस मिळाले होते, ते दोघेही सध्या जेल मध्ये आहेत.

या पेपर ड्रग्जचा आकार एका पोस्टाच्या तिकीटा एवढा असतो त्याची किंमत 5000 हजार रुपयांपर्यंत असते,वेगवेगळ्या रंगाच्या व चित्राचे हे स्टिकर असतात, त्यावर केमिकल मारून त्याचा पेपर ड्रग्ज बनवतात त्यालाच लेसर्जिक ऍसीड डायइथाईल अमाईड म्हणजेच एल एस डी ड्रग्ज म्हणतात, त्या तिकिटाचे चार तुकडे करतात आणि त्यातील एक तुकडा टाळूला लावतात किंवा जिभेखाली ठेवतात व त्यावर व्होडका किंवा जीनचा पेग मारतात त्याने बारा ते तेरा तास ही नशा राहते, पेपर ड्रग्ज जर थोड्या प्रमाणात सापडला म्हणजे •0002 ग्रॅम ह्या प्रमाणात तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आहे आणि जर कमर्शिअल क्वांटिटी मध्ये सापडला म्हणजे 1•6 ग्रॅम पर्यंत तर त्या व्यक्तीला 20 वर्षपर्यंत शिक्षा आहे.

पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की जर आपल्या मुलाकडे अशा प्रकारचे स्टॅम्प सापडले तर लगेच त्याची विचारपूस करा आपला मुलगा अमली पदार्थाच्या आहारी गेला नाही ना याची खात्री करा.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!