ठाणे , दिवा – दिवा कचराभूमीला सातत्याने लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्या
दिव्यातील कचऱ्याची दुर्गंधी सर्व परिसरात पसरत असून या दुर्गंधीमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. तसेच कचराभुमीला सातत्याने आग लागण्याची घटना घडत असून या आगीच्या धुरामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. याशिवाय, कचराभुमी शेजारीत खाडीचे पात्र असून त्याठिकाणही कचराभुमीतील कचरा पडत आहे. त्यामुळे खाडीचे पाणी आणि तेथील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सर्वाच्या पाश्र्वाभूमीवर स्थानिकांकडून कचराभुमी बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीच्या आधारे महापालिका प्रशासनाने कचराभुमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्याठिकाणी उद्यान उभारण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. मात्र, हा प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतला. असे असतानाच या कचराभुमीला मंगळवारी सकाळी सात वाजता पुन्हा आग लागली. या आगीने काही काळात रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर आग विझविण्याचे काम तात्काळ सुरु केले. तीन पाणी टँकरच्या साहय्याने ही आग विझविण्याचे काम सुरु होते. मात्र, दुपारपर्यंत आग विझविण्यात दोन्ही विभागांना यश आले नव्हते. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. त्याचा स्थानिकांना त्रास झाल्याचे दिसून आले.
संतोष कदम, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महानगर पालिका – ही कचराभूमीची आग रात्री लागलेली वा लावलेली आहे. तर सकाळच्या वेळी सुटणाऱ्या हवेमुळे त्या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. पण यश येत नसल्याने पुन्हा पाण्याचे टॅंकर तेथे पाठवण्यात आले. या आगीमुळे दिव्यात सर्वीकडे धुराचे साम्राज्य पसरलेलं होतं