ठाणे

दिवा पोलिसांमुळे मिळाले रिक्षात हरवलेले साडे चार तोळ्यांचे दागिने.

ठाणे :  मनिंदर कौर वय 48 वर्ष ,रा. दिवा दिवा आगासन रोड सिद्धिविनायक गेट, आयुष अपार्टमेंट नंबर 401 दिवा सदर महिलेचे दिवा रेल्वे स्टेशन ते सिद्धिविनायक गेट येथे रिक्षाने प्रवास करताना काल ( 26 नोव्हेंबर 2019) रोजी दुपारी 02:00 वा. दरम्यान रिक्षामध्ये प्लास्टिकची पिशवी विसरली सदर पिशवीमध्ये सोन्याचा एक नेकलेस 2 तोळ्याचा व सोन्याच्या 2 बांगड्या अडीच तोळ्याच्या असे एकूण 4.5 तोळे सोन्याचे दागिने विसरले होते त्याबाबत दिवा पोलिस चौकी येथे सदर महिलेने तक्रार नोंदवली असता दिवा पोलीस चौकी मधील psi सरडे, पोलीस हवालदार गवळी व कर्मचारी यांनी सदर भागातील सीसीटीव्ही चेक करून रिक्षाचालक याचा शोध घेऊन सदर सोने ताब्यात घेतले व तो आज रोजी महिला तक्रारदार हिस मुंब्रा पोलीस स्टेशन येथे परत करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!