ठाणे

अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पहिल्या मोर्चाला मोठं यश

६,५०० कंत्राटी कामगारांना ३ आठवड्यात मिळणार ९० कोटी रुपये

महापालिका प्रशासनाचे मनसेला लेखी पत्र

नवी मुंबई (प्रतिनिधी) – अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर काढण्यात आलेल्या थाळीनाद महामोर्चानंतर नवी मुंबई महापालिकेत घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणी पुरवठा अश्या विविध १७ विभागात काम करणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचे किमान वेतन फरक ९० कोटी रुपये पुढील ३ आठवड्यात देण्याचे लेखी पत्र महापालिका प्रशासनाने मनसेला दिले. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण गुरुवारी पहायला मिळाले. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा आज मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी तर दुसरीकडे अमित राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातला हा पहिला मोर्चा होता. त्यामुळे हा मोर्चा कितपत यशस्वी होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचे किमान वेतन फरक ९० कोटी रुपये व कचरा वाहतूक कामगारांचे ४३ महिन्यांचे किमान वेतन फरक तात्काळ मिळावा यासाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. गुरुवारी दुपारी १२ वाजता सिवूडस रेल्वे स्टेशन (पश्चिम) ब्रिजखालून या थाळीनाद महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर महापालिका मुख्यालय येथे या महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या महामोर्चामध्ये तीन ते चार हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.

फेब्रुवारी सन २०१५ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन फरक मिळावा यासंदर्भातील आदेश निर्गमित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतुद करून सदर प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळून सुद्धा यावर्षीचा नोव्हेंबर महिना संपला तरी या कामगारांचे १४ महिन्यांचे ९० कोटी रुपये थकीत वेतन तसेच उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कचरा वाहतूक कामगारांचे ४३ महिन्यांचे थकीत वेतन अद्याप मिळालेले नव्हते. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच शहर अभियंता यांना अनेकदा भेटून निवेदने दिली होती. तरी सुद्धा कंत्राटी कामगारांच्या बाबतीत महापालिका प्रशासनाला कोणतेच सोयरे सुतक नसल्याचा आरोप मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला होता. त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना खडबडून जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका मुख्यालयावर गुरुवारी थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला.

यावेळी मनसेचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, नवी मुंबई शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, चिटणीस गजानन ठेंग, सहचिटणीस संजय सुतार, मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, शहर सचिव सचिन कदम, शहर सचिव रुपेश कदम, शहर सचिव सचिन आचरे, शहर सहसचिव विनय कांबळे, शहर सहसचिव शशिकांत कळसकर, महिला सेना शहर अध्यक्षा डॉ.आरती धुमाळ, महिला सेना उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष अरुण पवार, अभिलेष दंडवते, विभाग अध्यक्ष प्रेमराज जाधव, प्रविण वाघमारे, मयूर चव्हाण, अक्षय भोसले, मनविसे उपशहर अध्यक्ष सनप्रित तुर्मेकर, मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!