डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील अर्धेअधिक फुटपाथ दुकानदारांनी व्यापले असून जे राहिले आहेत त्यावरील झाकण तुटलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे या फुटपाथवर चालल्यास चेंबर मध्ये पडण्याची भीती आहे. डोंबिवलीतील पूर्व स्टेशनजवळील पाटकर भुवन इमारतीजवळील तुटलेल्या अवस्थेतील झाकण पाहून नागरिकांना या फुटपाथवरून चालण्यास धोका असल्याचे सांगितले. एका जागरूक नागरिक केवल विकमानी यांनी या परिस्थितीचा फोटो सोशल मिडीयावर टाकला आहे.याची चर्चा सुरु असून पालिका प्रशासनाने याची दाखल घ्यावी असे नागरीक म्हणत आहेत.
डोंबिवलीतील पूर्व स्टेशनजवळील पाटकर भुवन इमारतीजवळील फुटपाथवर चेंबरवरील झाकण तुटलेले आहेत. त्यात कोणी पडू नये म्हणून झाकणावर लाद्या ठेवल्या आहेत.मात्र पालिका प्रशासन याकडे का लक्ष देत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एका जागरूक नागरिक केवल विकमानी यांनी या ठिकाणी नागरिक पडू नये म्हणून पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.डोंबिवलीतील अनेक फुटपाथची अशीच अवस्था आहे. एखादा नागरिक चेंबरमध्ये पडून जखमी झाल्यास याला पालिका प्रशासन जबाबदार राहील का असा प्रश्न डोंबिवलीकराना पडला आहे.