इंदिरा चौकात वाजवले फटाके…
डोंबिवली : शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.तर तीन पक्षातील प्रत्येकी दोन अश्या एकूण सहा मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली.डोंबिवलीत या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्यहार अपूर्ण केले.तर भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.पुढे इंदिरा चौकात महाविकास आघाडीने फटाके वाजवून एकच जल्लोष केला. तर शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या समोर ढोल- ताश्याच्या गजरात आनंद साजरा केला.तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी गुलाबही उधळले होते.तर बेफान होऊन नाचले.शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकत्र पाहण्याचा ऐतिहासिक क्षण पाहण्यास मिळाला.