गुन्हे वृत्त

बोरिवलीच्या आयसी कॉलनीतील चोऱ्यांचा उलघडा

१५ दुकाने फोडणारी सराईत चोरट्यांची टोळी गजाआड

बोरिवली :    बोरिवलीतील आयसी कॉलनीतील १५ दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात आले. कारवाईदम्यान २ चोरीच्या दुचाकी, घरफोडीसाठी लागणाऱ्या २ कटावण्या, पक्कड स्क्रूड्रायव्हर, मोबाईल फोन, ६ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घरफोडी करणारी सराईत टोळी एचबी कॉलनी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होणार असल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ ११ चे उपायुक्त डॉ. मोहन दहिकर यांनी दिली.

१६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान बोरिवली परिसरातील आयसी कॉलनी येथील हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, सलून, सुपर मार्केट, स्टेशनरी दुकान, बिअर शॉपी यांसारख्या १५ दुकानांचे शेटरचे टोळे कटावनीने कापून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सलग ३ दिवसांत रात्रीच्या वेळी चोरट्यांनी डल्ला मारल्याने आयसी कॉलनी परिसरातील रहिवाशांमध्ये घबराहट पसली होती. पोलिसांनी सदर परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवली. दरम्यान, गुन्ह्यांची उकल होण्यासाठी वरिष्ठांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली. चोरट्यांचा शोध सुरू असताना विशेष पथकातील गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे यांना खबऱ्याने माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोउनि धोत्रे यांनी पोलीस पथकाच्या मदतीने नालासोपारा येथून रशीद मोहम्मद रफीक शेख (२८) याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान रशीदने दुकान फोड्यांमध्ये सहभागी असलेल्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्या माहितीच्या नालासोपारा व विरार परिसरातून पोलिसांनी हुसेन मोहम्मद रफकी ोख (२६), राजू आंबेकर (४८) यांना बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान या तिघांनी मुंबई, ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई परिसरात अशा प्रकारे दुकानात डल्ला मारल्याची कबुली एमएचबी कॉलनी पोलिसांना दिली. तिघेही पोलीस रेकॉर्डवरील मुंबई, नवी मुंबई, पालघर, मुंबई उपनगर, ठाणे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून, नुकतेच तिघेही तुरुंगाबाहेर आले होते. तुरुंगाबाहेर आल्यानंतर तिघेही पुन्हा सक्रिय झाले होते.
आयसी कॉलनीतील घरफोड्यांचे गुन्हे अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ ११ चे उपायुक्त डॉ. मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि विजय धोत्रे, दीपक हिंडे, वाघचौरे, हवालदार जोपळे, खान, कोकिटकर, शिंदे, चौधर, पोना खताते, मोरे, पोशि सांगळे, काळे, होनमाने, भागवत, तावडे आदी पथकाने उत्कृष्टरीत्या तपास करून उघडकीस आणले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!