मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी ६.४० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. आपल्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे परिवारासह या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.
शपथविधी सोहळ्यास राज ठाकरे उपस्थित राहणार
November 28, 2019
39 Views
1 Min Read

-
Share This!