डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा म्हणून सर्व नागरिकांची इच्छा होती.डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने जोपर्यत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यत डोक्यावरील टोपी काढणार नाही अशी शपथ घेतली होती.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आपली इच्छा पूर्ण झाली असून आता डोक्यावरील टोपी काढणार असे रिक्षाचालकाने संगीतले.
`अपंग व्यक्तींना विनामुली रिक्षा प्रवास` अशी अनेक वर्षापासून सेवा देणारे डोंबिवलीतील रिक्षाचालक कट्टर शिवसैनिक आहेत शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत पांढरी टोपी काढणार नाही असा पण रिक्षाचालक पाटील यांनी केला आहे. सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतरच जो पर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत डोक्यावरून टोपी काढणार नाही नाही अशी शपथ घेतली होती. गुरूवार सायंकाळी झालेल्या शपथ विधीनंतर हा रिक्षाचालक शिवतिर्थावर गेला होता. त्यावेळी रिक्षाचालक पाटील यांनी डोक्यावरील टोपी काढली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाजकारणाच्या शिकवणीनुसार अनेक वर्ष पासून अपंगाना विनामुल्य सेवा देत असून ही सेवा कायम राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.