डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील भोईर जिमखाना येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ८०शाळांमधून डोंबिवलीतील तीन शाळा अव्वल आल्या आहेत.डोंबिवलीतील ज्ञानेश्वरी विद्यालय,ओमकार इंटरनॅशनल स्कूल आणि हॉली ईजल स्कूल या तीन शाळांनी या स्पर्धेत सर्वाधिक मेडल मिळवून चषकाचे मानकरी ठरले.
भोईर जिमखाना आयोजित ज्ञानेश्वरी विद्यालय चषक कै.शकुंतला मुरलीधर तरटे आणि मुरलीधर विष्णू तरटे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय आंतरशालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबई, पनवेल,पालघर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, ठाणे, बोरीवली, अंधेरी येथील सुमारे ८० शाळांमधून एकूण ३०० खेळांडूनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डोंबिवलीतील भोईर जिमखाना येथे पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोईर जिमखान्याचे संस्थापक मुकुंद भोईर, माजी नगरसेवक तथा डोंबिवली अभिनव बँकेचे संचालक दिलीप भोईर, संजय चौधरी, पत्रकार शंकर जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार नरेद्र थोरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत विजेत्या १२५ खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देण्यात आली. या स्पर्धेत डोंबिवलीतील तीन शाळा अव्वल आल्या.डोंबिवलीतील ज्ञानेश्वरी विद्यालय,ओमकार इंटरनॅशनल स्कूल आणि हॉली ईजल स्कूल या तीन शाळांनी या स्पर्धेत सर्वाधिक मेडल मिळवून चषकाचे मानकरी ठरले. यावेळी मुकुंद भोईर म्हणाले, ही स्पर्धा २००५ पासून सुरु असून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि या खेळाडूंनी राज्यस्तरीय, देशपातळीवरील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपला दर्जेदार खेळ सादर करून दाखवावा हा मागील उद्देश आहे.भोईर जिमखान्याचे उद्घाटन स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे या जिमखान्यातील प्रत्येक खेळाडूंच्या डोक्यावर स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. स्व. सुरेद्र बाजपेयी, स्व.शशिकांत ठोसर आणि स्व.ज्येष्ठ साहित्यिक शंन्ना नवरे यांचा मोलाचा हातभार होता. मी आणि पवन भोईर, प्रशिक्षक हे नेहमी या खेळाडूंना जिल्हास्तरीयच नव्हे तर राज्यस्तरीय, देशपातळीवरील स्पर्धेत आपले नाव, डोंबिवलीचे शहर,आई-वडिलांचे नाव आणि भोईर जिमखान्याचे नाव उंचावण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. यावेळी सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय, आणि आभार प्रदर्शनांची जबाबदारी पवन भोईर यांनी सांभाळली.