कल्याण ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या गडांपैकी एक श्रीमलंगगडावर गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली .या मोहिमेत सुरज सुतार ,निलेश माने, पराग चल्लरे,वैभव ऐवळे, सुमित नाईकधुरे, किरण चौरसिया ,शितल आहेर हे गिर्यारोहक सहभागी झाले होते .
कल्याण पूर्व पासून नजीक अंबरनाथ तालुक्यात श्रीमलंगगड आहे . या गडावर जाण्याच्या सर्व वाटा एका ठीकाणी येऊन थांबत असल्याने हा गड सर करणे सोपे नाही. पूर्वी येथे दगडी पायऱ्या होत्या असे म्हंटले जाते पण, काही वर्षंपूर्वी त्या कोसळल्या आणि किल्ल्यावर जाण्याचा मार्ग बंद झाला. जिथे सहसा कोणी जाण्याचा चा ही विचार करत नाही.येथे जाण्यासाठी ५० फूट खोल दरी आणि हा टप्पा पार करण्या साठी २२/२५ फुट एक पाईप लावण्यात आला आहे .अत्यंत अचूक आणि संपूर्ण प्रस्तहारोहनच्या ज्ञान असलेल्या व्यक्तींनाच हा टप्पा पार करत येतो असे निलेश माने यांनी सांगितले अभेद्य अश्या आणि डबघाईला आलेल्या पायऱ्या तसेच त्या नंतर येणारी सोनमाची आणि त्यानं नंतर अत्यंत कठीण असा टप्पा जो प्रस्तहारोहनच्या शिवाय पार करू शकत नाही. हा टप्पा पार केल्यावर ८० अंशाच्या कोनात कातळात कोरलेल्या पायऱ्या त्या चढून गेल्यावर पुढे गडा चा बाले किल्ला येतो.ज्या वर राजवाड्याचे अवशेष आणि ७० लक्ष पाणी साठेल अश्या भव्य ७ पिण्याचे पाण्याचे टाक्या आज ही शाबुत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावकरी ह्या टाक्याची साफ़-सफाई करतात आणि हेच पाणी पुढे वर्षभर वापरले जात असल्याचे माने यांनी सांगितले . या मोहिमेच्या उद्देशाने दुर्लक्षित असे गड-किल्याचे संवर्धन करण्यासाठी गावकऱ्यांनी, सामाजिक नेत्यांनी/कार्यकर्त्यांनी, वनविभागाने पुढाकार घ्यावा असे मत गिर्यारोहक निलेश माने यांनी व्यक्त केले .या मोहिमेच्या उद्देशाने एड्स बद्द्ल असलेली लोकांच्या मनातील चुकिचे समज आणि अपंग व्यक्ती देखील मनात साहस निर्माण करून अश्यक्य गोष्टी शक्य करू शकतात असा संदेश देण्यात आला असे ही गिर्यारोहक निलेश माने यांनी सांगितले