ठाणे

स्व.शिवाजी दादा शेलार चषकावर  वाकलन संघाची मोहोर

पोलिसांच्या सामन्यात टिळक नगर  विजयी

डोंबिवली   ( शंकर जाधव  ) ह.भ.प.सावळाराम क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या यावर्षीच्या स्व.शिवाजी दादा शेलार चषकावर वाकलन क्रिकेट संघाने नाव कोरले.साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीने हे सामने आयोजित केले होते.क्रिकेट सामन्यातील अंतिम फेरीत वाकलन संघाने  सोनारपाडा स़ंघावर मात केली.विजयी वाकलन संघास माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दोन लाख आणि स्व.शिवाजी दादा शेलार चषक प्रदान करण्यात आला. तर उपविजेता सोनारपाडा संघास एक लाख व चषक देण्यात आला. वाकलन संघाच्या जित भोईर या खेळाडूची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.पोलिसांच्या सामन्यात टिळक नगर पोलिस ठाण्याने मानपाडा पोलिसांवर बाजी मारली.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक साई शेलार, स्वरा शेलार, सिध्दार्थ शेलार, भाजप पदाधिकारी राजू शेख, दिलीप भंडारी, प्रसाद परब,  परेश जोशी उपस्थित होते.अंतिम सामन्यात सोनारपाडा संघ अवघ्या ३३ धावावर वाकलन संघाने गुंडाळल्यामुळे वाकलन संघास सोनारपाडा संघावर सहज मात करता आली. संपूर्ण सामन्यातील सहभागी संघातून मालिकावीर जित भोईर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषी भोईर (माणेरे), उत्कृष्ट गोलंदाज तेजस भोईर(माणेरे), उत्कृष्ट फलंदाज सुरेश धुतकर (वसार), उदयोन्मुख खेळाडू सोनारपाडा संघातील चिराग ठाकूर यांची निवड करण्यात आली. विनायक गायकवाड, शेखर शर्मा, विक्रम शेलार, जितू शेलार, गुरुनाथ कापसे, चिंतामणी पाटील, ज्ञानेश्वर मुळे, सचिन बाबर, विशाल शेलार, सामन्यांचे  समन्वयक प्रसाद परब यांनी २९ नोव्हेंबर पासून सुरु असलेले सामने यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!