ठाणे दि ६ डिसेंबर २०१९ : ठाणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन एम्प्लोइज फेडरेशनच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी मुख्य लेखा व वित्तधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) डी. वाय. जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बढे, कार्यकारी अभियंता माणिक इंदुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी मनिष रेघे, उप मुख्य लेखा व वित्तधिकारी मयूर हिंगाने तसेच रि. फ. फेडरेशनचे संजय थोरात, दादासाहेब शिंदे, सुधीर घिगे, कमलाकर वांगीकर, भगवान पवार उपस्थित होते.
वरील मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.